खो खो

खो खो

 

कौशल्ये :

अ) चौरसात बसणे, बुलेट पद्धत, पॅरलल पद्धत, योग्य खो-देणे

ब) आक्रमणाचे प्रकार :- सरळ आक्रमण, उलट आक्रमण, बचावात्मक आक्रमण

क) खांबावर सूर मारणे, फसवा खो-देणे

ड) बचावात्मक कौशल्ये :- एकेरी साखळी, दुहेरी साखळी, रिंग, ३-६-९ पळणे

नियम

१) विभाग १ मधील आकृतीत दर्शविल्याप्रमाणे खेळाचे मैदान आखावे.

२) पंच प्रमुख मध्यपटीच्या जवळ पलीकडे मधोमध, वेळाधिकारी व गुणलेखक क्र. १ यांच्याकडे तोंड करून उभा राहील व दोन्ही संघनायक नाणेफेकीसाठी बोलावील आणि त्यापैकी एकास नाण्याच्या कोणत्याही एका बाजूची निवड करण्यास लागले. नंतर नाणेफेक करून निर्णय जाहीर

करेल.

टीप :- नाणेफेक जिंकणारा संघनायक आपला हात वर करील आणि लगेच आक्रमण अगर संरक्षण यापैकी एकाची अनुक्रमे मध्यपाटीकडे वा बाजू रेषेकडे तर्जनीने दर्शवून आपली निवड स्पष्ट करील. कुणीही संघनायक नाणेफेक केलेल्या नाण्याला कधीही स्पर्श करणार नाही. स्पर्श केल्यास पंचप्रमुख विरूद्ध संघाच्या कर्णधारास नाणेफेक विजयी घोषित करेल. नाणे पुरेसे जड असेल. दोन्ही संघाच्या कर्णधाराने आपल्या दंडावर पट्टी बांधावी.

३) कोणतेही आठ आक्रमक आक्रमकाच्या जागेत बाजू रेषांकडे तोंडे करून अशा रीतीने बसतील की, लगतच्या आक्रमकांची तांडे एकाच बाजूरेषेकडे असणार नाहीत. ९वा आक्रमक आक्रमण सुरू करण्यासाठी कोणत्याही एका मुक्तक्षेत्रात उभा राहील. एकदा निवडलेले क्षेत्र बदलता येणार नाही.

४) पाळीची सुरूवात केल्यावर कुणीही आक्रमकाने खो मिळाल्याशिवाय आक्रमकाची जागा सोडू नये किंवा दिशा बदलू नये. त्याने तसे केल्यास ते नियमोल्लंघन आहे आणि त्याची पुनरावृत्ती म्हणजे गैरवर्तणूक ठरेल.

५) पाळीची सुरूवात करताना तीन संरक्षकाची पहिली तुकडी क्षेत्राच्या आत असेल आणि बाकीचे रक्षक त्यांच्यासाठी नेमलेल्या ठिकाणी बसतील

६) बाद झालेल्या संरक्षकाने त्वरीत जवळच्या बाजू या अंत रेषेकडून क्रीडांगणाबाहेर जावे. खेळाला अडथळा करू नये. त्यांनी त्यांच्यासाठी नेमलेल्या ___ जागेवर बसावे.

७) गतिमान आक्रमकाने स्तंभ रेषेच्या क्रीडांगणाकडील बाजूकडून मध्यपाटी ओलांडून पलीकडच्या भागात अथवा मुक्तक्षेत्रात जाऊ नये.

टीप :- अ) सुयोग्य रितीने खो मिळाल्यानंतर आक्रमकाची जागा सोडताना जर गतिमान आक्रमकाच्या पहिल्या पाऊलांचा स्पर्श, मध्यपाटीच्या रेषेला, जी गतीमान आक्रमकाचे तोंड असलेल्या बाजू रेषेला जवळ असेल (गतिमान आक्रमकाचे पाऊल रेषेच्या आत पडता कामा नये) तसे झाल्यास नियमोल्लंघन देऊ नये.

ब) गतिमान आक्रमकाने आक्रमण करीत असताना त्या भागाच्या बाजूला असलेल्या मध्यपाटीच्या रेषेला स्पर्श केल्यास/छेदल्यास ते नियमोल्लंघन घोषित करू नये. मात्र गतिमान आक्रमक संरक्षकास स्पर्श करीत असताना किंवा स्पर्श करण्याचे वेळेस अथवा बाद करण्याच्या क्रियेचा परिणाम म्हणून वरील कृती घडली तर नियमोल्लंघन घोषित करावे आणि संरक्षकास नाबाद ठरवावे.

८) खो देते वेळी तो आक्रमकाचे पाठीमागून खांदा व कमरेच्या मधील भागास हात लावून आणि संरक्षकास व अधिकाऱ्यांना ऐकू जाईश अशा स्पष्ट व __ मोठ्या आवाजात दिला पाहिजे. आक्रमकाने खो दिल्याशिवाय उठू नये.

टीप :- अ) गतिमान आक्रमकाने आक्रमकांनी पुढे केलेल्या व झुकलेल्या हातास, पायास किंवा शरीराच्या कोणत्याही भागास स्पर्श करून खो देऊ नये.

ब) खो देते वेळी आक्रमकाच्या पाठीलाच हस्तस्पर्श करावा असा आग्रह करू नये.

क) गतिमान आक्रमकाने खो देताना सुरूवातीला खो उच्चारणे व नंतर आक्रमकाला स्पर्श करणे नियमोल्लंघन आहे.

ड) गतिमान आक्रमकाने आक्रमकास स्पर्श करणे हे नियमोल्लंघन नाही मात्र आक्रमकास हस्तस्पर्श न करता खो बोलणे नियमोल्लंघन होईल.

इ) गतिमान आक्रमकाने खो देताना खो व्यतिरिक्त इतर तत्सम शब्द उच्चारणे नियमोल्लंघन होईल. तसेच आक्रमण चालू असताना आक्रमकाने खो किंवा इतर शब्द उच्चारणे नियमोल्लंघन ठरेल.

९) खालील तीन स्थितीत गतिमान आक्रमकास खो देताना परवानगी आहे मात्र गतिमान आक्रमकाच्या पाऊलाचा स्पर्श आडव्या पाटीच्या पुढे जाता कामा नये.

टीप :-

अ) गतिमान आक्रमकाच्या पुढील पावलाचा स्पर्श आडव्या पाटीशी असणे बंधनकारक नाही. ब) गतिमान आक्रमकाचे पाऊल आडव्या पाटीत असल्यास

क) गतिमान आक्रमकाचे पाऊल आडव्या पाटीत व संपूर्ण शरीर आडव्या पाटीच्या पुढे असल्यास

ड) खुंटाजवळ आक्रमण सोडून (१ आणि ८) इतर आक्रमकास गतिमान आक्रमकाने स्पर्श केल्यास आक्रमण करण्यास हरकत नाही. गतिमान आक्रमकास हस्तस्पर्श करून आडव्या पाटीत आक्रमण करत असल्यास व लांबून खो बोलल्यास नियमोल्लंघन होईल. गतिमान आक्रमक आडव्या पाटीकडून बाजूरेषेकडे आक्रमण करत असेल व कोणतेही नियमोल्लंघन न करता आडव्या पाटीतून मागे आल्यास खो देऊ शकतो.

इ) गतिमान आक्रमकाने आक्रमकाचा आधार घेऊन संरक्षकास बाद केल्यास ते नियमाल्लंघन होईल.

१०) खो दिल्यानंतर गतिमान आक्रमक तत्क्षणी आक्रमक होई आणि त्याने ज्या आक्रमकाला खो दिला असेल त्याच्या (आक्रमकाच्या) जागी तो ताबडतोब बसेल.

टीप:- अ) सुयोग पद्धतीने खो दिल्यानंतर आक्रमकाच्या आडव्या पाटीशी असलेला पाऊलांचा स्पर्श आक्रमकाच्या जागी बसताना सुटला तर ते नियमोल्लंघन नव्हे.

ब) खो दिल्यानंतर आक्रमकाच्या जागी ताबडतोब/चटकन बसण्यासाठी जो नैसर्गिक वेळ लागले त्यास परवानगी असेल मात्र संरक्षकास अडथळा येता कामा नये. तसे आक्रमकाने केल्यास ते नियमोल्लंघन ठरेल.

क) सुयोग खो मिळाताचक्षणी गतिमान आक्रमकाच्या जागेतून संरक्षकास स्पर्श करू शकतो. ११) खो मिळाल्यानंतर आक्रमक होतो व त्याने तोंड असलेल्या क्रीडांगणाच्या भागात गेले पाहिजे. तसेच बसलेल्या आक्रमकाची जागा आडवी पाटी तोडून घेतलेल्या दिशेने गेले पाहिजे. त्याला मागे हटता येणार नाही. मागे हटणे हे नियमोल्लंघन होईल.

टीप:- अ) आडव्या पाटीत जोपर्यंत गतिमान आक्रमकाच्या पाऊलाचा स्पर्श आहे तोपर्यंत त्याने पाटी सोडली असे होत नाही.

ब) दिशा घेतल्यानंतर गतिमान आक्रमक जोपर्यंत तोडलेले अंतर मागे पाऊल टाकून अथवा घसरल्याने कमी करून आक्रमण सुरू करीत नाहीत तोपर्यंत ते नियमोल्लंघन होणार नाही.

क) गतिमान आक्रमकाने सुर मारल्यानंतर उठताना पाय मागे आल्यास ते नियमोल्लंघन होणार नाही.

१२) गतिमना आक्रमकाने ज्या दिशेस आपली स्कंधरेषा वळवली असेल त्या दिशेस त्याने गेले पाहिजे. विशिष्ट दिशेने जात असताना गतिमान आक्रमकाने आपली स्कंधरेषा घेतलेल्या दिशेशी ९० अंशाहून अधिक वळविल्यास ते नियमोल्लंघन होईल.

१३) स्तंभाच्या आधाराने स्पर्श करताना ९० अंशाहून अधिक स्कंधरेषा वळणे किंवा क्रीडांगणाशी संबंधित पाय सरकणे हे नियमोल्लंघन नाही मात्र  मध्यपाटीला गतिमान आक्रमकाच्या शरीराचा कोणताही भाग स्पर्श होणे किंवा छेदणे/ओलांडणे नियमोल्लंघन आहे. १४) नियम क्र.११ आणि १२ मध्ये दिलेल्या क्रियांपैकी जी क्रिया गतिमान आक्रमक प्रथम करेल त्यानुसार ती दिशा त्याने घेतली पाहिजे.

१५) एकदा दिशा घेतल्यानंतर गतिमान आक्रमक, मध्यंतरी खो न दिल्यास मुक्त क्षेत्रात पोहोचेपर्यंत त्याच दिशेने जाईल. मुक्त क्षेत्रातून स्तंभाला वळसा घातल्याशिवाय गतिमान आक्रमक मध्यपाटीकडील क्रीडांगणाच्या भागात जाणार नाही.

१६) दिशा घेणे, मागे हटणे या संबंधीचे नियम मुक्तक्षेत्रात लागू असणार नाहीत.

१७) आक्रमकाने संरक्षकास अडथळा न होईल असे बसले पाहिजे. अशा अडथळ्याने संरक्षक बाद झाल्यास तो नाबाद ठरविला जाईल. तसेच ते नियमोल्लंघन ठरेल.

टीप :- अ) जर शरीराच्या कोणत्याही जाणीवपूर्वक हालचालीमुळे आक्रमकाचा संरक्षकास अडथळा निर्माण करण्याचा उद्देश वा प्रत्यक्ष अडथळा __ आढळला/संभावला तर संबंधीत आक्रमकास सामनाधिकारी ताकीद देतील आणि योग्य ती कारवाई करतील.

ब) संरक्षक मध्यपाटीजवळ आक्रमकाजवळून जात असताना त्या आक्रमकाने हलणे, खांदे/मांडी किंवा शरीराचा कोणताही भाग हेतुपुरस्सर  संरक्षकाकडे झुकवणे हे नियमोल्लंघन ठरेल.

१८) पाळी चालू असताना गतिमान आक्रमक क्रीडांगणाबाहेर जाऊ शकेल. मात्र क्रीडांगणाप्रमाणेच त्याला दिशा घेणे व मागे हटणे या संबंधीचे नियम पाळावे लागतील. स्पष्टीकरण - क्रीडांगणामधील हे नियम वाढविलेल्या कल्पित स्तंभरेषेमधील जागेमध्ये लागू असतील. गतिमान आक्रमक क्रीडांगणाबाहेर कल्पित स्तंभरेषेपलीकडे गेल्यास तो त्याच्या इच्छेप्रमाणे क्रीडांगणात/क्षेत्रात कोठूनही प्रवेश करू शकतो. त्याने मुक्त क्षेत्रातूनच प्रवेश करावा अशी सक्ती करु नये.

१९) संरक्षकाने बसलेल्या आक्रमकास हेतुपुरस्सर स्पर्श करू नये. तसे केल्यास संरक्षकास एक वेळ ताकीद दिली जाईल. जर त्याच संरक्षकाने याची

पुनरावृत्ती केली तर तो बाद दिला जाईल.

२०) गतिमान आक्रमकाने कोणतेही नियमोल्लंघन न करता संरक्षकास हस्त स्पर्श केल्यास संरक्षकास बाद दिले जाईल तसेच संरक्षक क्षेत्राबाहेर गेल्यास संरक्षकास शिटीचा लघू आवाट काढून बाद दिले जाईल.

टीप:- अ) संरक्षकास मुद्दाम ढकलणे, पकडणे, ओढणे, मारणे ही गैरवर्तणूक धरली जाईल.

ब) संरक्षकाचा पाठलाग करताना गतिमान आक्रमकाने नियमोल्लंघन झाल्यावर क्रीडांगणाबाहेर ढकलल्यास तो संरक्षक नाबाद ठरेल.

२१) गतिमान आक्रमकाने आणि आक्रमकांनी त्यांच्यासाठी असलेल्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन करू नये. कोणत्याही नियमांचा भंग हे नियमोल्लंघन ठरेल.

टीप :-

अ) नियमोल्लंघनामुळे संरक्षक बाद झाला किंवा संरक्षक बाद करण्याच्या क्रियेचा तत्क्षणिक परिणाम म्हणून नियमोल्लंघन झाले तर संरक्षक नाबाद ठरेल. नियमोल्लघंनामुळे बाद होण्यापासून द्यावयाचे संरक्षण नियमोल्लंघन होत असताना जो गतिमान संरक्षक असेल त्यालाच दिले जाईल.

ब) बाद करण्याच्या क्रियेचा तत्क्षरिक परिणाम म्हणजे बाद करण्याची क्रिया व नियमोल्लंघन यामध्ये वेळेचे अंतर असता कामा नये. बाद करण्याची क्रिया होणे, चालू रहाणे (फॉलो थू) यामध्ये नियमोल्लंघन झाले असले पाहिजे. गतिमान आक्रमकाने संरक्षकास हस्तस्पर्श करताच पाळी संपल्याचे जाहीर झाले, पण तत्क्षणिक त्याच गतिमान आक्रमकाकडून बाद करण्याच्या क्रियेचा परिणाम म्हणून नियमोल्लंघन झाले तर अशावेळी तो संरक्षक

नाबाद ठरवावा.

२२) गतिमान आक्रमकाने कोणत्याही नियमाचा भंग केल्यास सामनाधिकाऱ्यांनी शिट्टीच्या सतत लघू आवाजाने नियमोल्लंघन घोषित करावे आणि गतिमान आक्रमक ज्या दिशेने जात असेल लगेच त्याच्याविरूद्ध जाण्यास त्याला भाग पाडावे. सामनाधिकाऱ्यांनी आपल्या शिट्टीद्वारे दिलेला इशारा ऐकताच गतिमान आक्रमक सामनाधिकाऱ्यांनी दर्शविलेली दिशा देईल. अशा वेळी गतिमान संरक्षण बाद केल्यास तो बाद दिला जाणार नाही आणि गतिमान आक्रमकास सामनाधिकाऱ्यांनी दर्शविलेली दिशाच घ्यावी लागेल. त्याने खो दिलाच पाहिजे असे नाही.

२३) नियमातील सवलत :- आक्रमक अथवा गतिमान आक्रमकाच्या नियमोल्लंघनामुळे जर आक्रमण करणाऱ्या संघाचा फायदा तसेच संरक्षकाचे नुकसान होत नसेल तर शिट्टीच्या सतत लघु लहरीद्वारे नियमोल्लंघन घोषित करू नये.

२४) गतिमान आक्रमक स्तंभाला लाथ/पाय मारून दिशा बदलू शकत नाही तसे केल्यास नियमोल्लंघन घोषित केले जाईल.

सामन्यासंबंधी नियम

१) प्रत्येक संघात १ व्यवस्थापक, १ प्रशिक्षक व १२ खेळाडूंचा समावेश असेल. त्यातील ९ खेळाडूंनी सामन्याची सुरूवात होईल.

२) पुरूष, महिला, कुमार-मुलींसाी प्रत्येकी ९ मिनिटांची एक आक्रमणाची व एक संरक्षणाची पाळी मिळून एक डाव होईल. किशोर व किशोरी करीता पाळी ७ मिनिटांची असेल. प्रत्येक सामना दोन डावांचा असेल. दोन डावात ६ मिनिटांचा व प्रत्येक पाळीनंतर ३ मिनिटांचा मध्यंतर पुरूष महिला/कुमार-मुलींकरीता आणि किशोर-किशोरी करीता हीच वेळ अनुक्रमे ५ मिनीटे व २ मिनिटे असेल.

३) कर्णधार/प्रशिक्षक आपल्या संघातील रक्षक खेळाडूच्या गणवेशावरील क्रमांकाप्रमाणे नावे सामना सुरू होण्यापूर्वी गुणलेखक क्र. १ कडे देतील. पाळीच्या सुरूवातीला पहिले तीन रक्षक संरक्षणासाठी क्षेत्राच्या आत असतील. तुकडीतील तिसरा संरक्षक बाद होताक्षणी नंतरचे तीन रक्षक प्रवेश क्षेत्रातून आत येतील. तसेच दोन सुयोग्य खो देण्यापूर्वी क्षेत्रात प्रवेश करणे बंधनकारक आहे. जो संरक्षक दान सुयोग्य खो मिळेपर्यंत क्षेत्रात प्रवेश

करणार नाही त्याला उशिरा प्रवेश म्हणून बाद दिले जाईल.

अ) रक्षकांचा व तुकड्यांचा निश्चित झालेला क्रम पाळी संपेपर्यंत बदलता येणार नाही. पंचप्रमुखाने एखाद्या संरक्षकास शिक्षा म्हणून तांबडे कार्ड दाखवून बाद दिले असेल तर त्याच चालू सामन्यातील उर्वरित वेळेसाठी सहभागी होता येणार नाही. त्याच्या ऐवजी बदली आलेला खेळाडू त्या ___ पाळीत ती तुकडी संरक्षणासाठी परत क्षेत्रात येणे आवश्यक असल्यास त्याच तुकडीतून संरक्षण करू शकेल.

ब) जे रक्षक अगोदर क्षेत्राच्या आत येतील त्यांना बाद घोषित न करता पंचप्रमुख अथवा गुणलेखक क्र. २ कडून क्षेत्राबाहेर बोलाविले जाईल.

क) तुकडीतील तिसऱ्या संरक्षकास बाद करणाऱ्या गतिमान आक्रमकास नवीन तुकडीतील संरक्षकांचा पाठलाग करता येणार नाही. त्याने नवीन __ तुकडीतील संरक्षकाचा पाठलाग केल्यास ते नियमोल्लंघन होईल. त्याने त्वरील खो दिलाच पाहिजे.

ड) आक्रमक संघ एक योग्य खो दिल्यानंतर क्रीडांगणात प्रवेश केलेल्या संरक्षकाचा पाठलाग करू शकेल. नवीन तुकडीतील संरक्षकाच्या पाठलागाची ___ सुरूवात दोन खो दिल्यानंतरच करावी असे बंधन नाही.

इ) तुकडीतील पहिला संरक्षक खेळाडू बाद झाल्यानंतर पुढील तुकडीचे तीन रक्षक प्रवेश क्षेत्रात आलेच पाहिजे.

फ) संरक्षक बाद झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या जवळील अंत अथवा बाजू रेषेकडून राखीव क्षेत्रातून आपल्या संघाच्या नियोजीत जागी जाऊन बसावे.

ग) तुकडीतील संरक्षक निश्चित झाले नसतील (प्रवेश क्षेत्रात नसतील) त्यावेळी दोन खो देण्यापूर्वी रक्षक प्रवेश क्षेत्रातून क्रीडांगणात आले नसतील तर

रक्षकापैकी कोणाला बाद द्यावे हे पंचप्रमुखाच्या अधिकारात असेल.

ह) तीन संरक्षकास उशिराप्रवेशम्हणून बाद दिल्यास पुढील तुकडी क्षेत्रात करण्याकरीता १५ सेकंदाचा अवधी दिला जाईल.

य) आक्रमक संघास संरक्षक संघाचा प्रत्येक खेळाडू बाद केल्यानंतर एक गुण प्राप्त होईल.

४) आक्रमक संघाच्या संगनायकाच्या पहिल्या डावात ठरलेल्या वेळेपुर्वी ९ गुण प्राप्त केल्यानंतर आपली पाळी संपविण्याचा पर्याय उपयोगात आणता येईल. पुढील डावात पाळी संपविऱ्यास ९ गुणांचे बंधन राहणार नाही. आक्रमक संघाचा कर्णधार उभा राहून सांकेतिक खूण करून पंचमुखास खेळ थांबविण्याचे सुचित करील. जोपर्यंत पंचप्रमुख खेळ संपल्याचे जाहीर करीत नाही तोपर्यंत पाळी संपणार नाही. पंचप्रमुखाने पाळी संपल्याचे जाहीर केले नाही तोपर्यंत आक्रमक आक्रमकाची जागा सोडणार नाहीत.

५) संरक्षण करणारा संघसुद्धा दुसऱ्या पाळीत ९ किंवा ९ पेक्षा जास्त गुणांचा फरक असल्यास पाळी संपल्याचे जाहीर करू शकतील. मात्र सदर संघाने पराभव स्विकारला असे मान्य करावे लागले.

६) बाद पद्धतीने खेळल्या जाणाऱ्या सामन्यात जो संघ सामन्याच्या शेवटी अधिक गुण मिळविल तो संघ विजयी घोषित केला जाईल. सामन्याचे शेवटी समान गुण झाल्यास एक जादा डाव (प्रत्येक संघास आक्रमण आणि संरक्षण एक पाळी) खेळविला जाईल. जर परत समान गुण झाले तर आणखी एक डाव लघुत्तम आक्रमण पद्धतीने पुढीलप्रमाणे खेळविला जाईल. पंचप्रमुख या डावातील पाळीच सुरूवात करील. पहिला गुण मिळताच क्षणी पंचप्रमुख पाळी संपवेल. त्याच वेळी तो आपल्याजवळील स्टॉपवॉच थांबवील. अशा त-हेने पहिला संरक्षक बाद करण्यासाठी कमी वेळ (लघुत्तम आक्रमण) लागेल तो संघ विजयी घोषित केला जाईल. दुसऱ्या पाळीत प्रतिपक्षाच्या नोंदविलेल्या वेळेपेक्षा आक्रमण ३० सेंकदाहून अधिक वाढले तर पंचप्रमुख खेळ थांबवील. गरज लागल्यास विजयी संघ ठरेपर्यंत या पद्धतीने खेळ चालू राहील. साखळी सामन्यात जिंकणाऱ्या संघास ३ गुण, हरणाऱ्या संघास शून्य गुण मिळतील. सामन्याचे शेवटी जर दोन्ही संघांचे समान गुण झाले तर प्रत्येक संघास १ गुण मिळेल. साखळी पद्धतीच्या सामन्यांचे मिळालेले गुण समान झाल्यास त्या गटात समान गुण झालेल्या संघामध्ये बाद पद्धतीने सामना होईल. काही कारणाने सामना घेणे वेळे अभावी शक्य नसल्यास सामना लघुत्तम आक्रम पद्धतीने खेळविण्यात येईल.

७) नैसर्गिक कारणाने एखाद्या स्पर्धेतील सामना अपूर्ण राहील्यास तो सामना त्याच खेळाडू व अधिकाऱ्यांनिशी पुढे चालू केला जाईल. मात्र सामना त्याच सत्रात खेळविला गेला पाहिजे. पूर्वी पूर्ण झालेल्या पाळ्यांचे गुण जमेस धरून अपूर्ण राहीलेल्या पाळीच्या सुरूवातीपासून सामना त्याच खेळाड़ व अधिकाऱ्यांसह पुढे खेळविला जाईल. (सामना अपूर्ण राहीला त्यावेळी जे १२ खेळाडू आणि अधिकारी असतील तेच त्यावेळीही असतील) मात्र अपूर्ण राहीलेला सामना त्याच सत्रा खेळविला गेला नाही तर संपूर्ण सामना सुरूवातीपासून परत खेळविला जाईल. अशा वेळी खेळाडू व अधिकारी पूर्वीचेच असले पाहिज असे बंधन असणार नाही. नैसर्गिक कारणाव्यतिरिक्त सामना अपूर्ण राहिल्यास ज्युरी ऑफ अपिल/तांत्रिक समिती/कार्यकारीणी निर्णय देईल.

दोन संत्रांचा वेळ खालील प्रमाणे असेल.

१) सकाळ सत्र सकाळी सामने सुरू झाल्यानंतर त्या सत्रामध्ये असलेले सामने संपेपर्यंत सत्र चालू राहील.

२) दुपारचे सत्र दुसरे सत्र सुरू झाल्यावर सामने संपेपर्यंत सत्र चालू राहील.

जर सामने प्रकाशझोतात (प्लड लाईट) खेळविण्यात येत असतील तर प्रकाशाची तीव्रता २५ लेक्सपेक्षा कमी नसावी.

८) सामन्याची सुरूवात आक्रमणाने करणाऱ्या संघाचे गुण पहिल्या डावानंतर दुसऱ्या संघापेक्षा ६ अगर संघास आक्रमण करण्यास सांगण्याचा (फॉलोऑन) पर्याय राहील. अशावेळी विरूद्ध संघाचे गुण अधिक झाल्यास पूर्वोक्त संघास आपल्या आक्रमणाचा हक्क न गमावता उपरोक्त संघास आक्रमण करण्यास सांगण्याचा (फॉलोऑन) पर्याय राहील. अशावेळी विरूद्ध संघाचे गुण अधिक झाल्यास पूर्वोक्त संघास आपल्या आक्रमणाचा हक्क वापरता येईल.

टीप:- ८ गुणांपेक्षा जास्त गुणांची आघाडी असल्यास उपरोक्त संघास फॉलोऑन द्यावाच लागेल. अशावेळी निर्णय लिहीताना.....संघ डाव राखून

विजयी लिहावे.

९) सामना संपल्यानंतर पंचप्रमुखाने निर्णय घोषित केल्यावरचन संघानी क्रीडांगणाबाहेर जावे. १०) बदली खेळाडू :- संघाच्या प्रशिक्षकाने किंवा संघनायकाने अथवा व्यवस्थापकाने विनंती केल्यास पंचप्रमुख खेळाडू बदलण्यास परवानगी देईल.

आक्रमणाची पाळी चालू असताना कितीही वेळ व कधीही पुढीलप्रमाणे....

अ) पंचप्रमुखाच्या सुचनेनुसार गुणलेखक क्र. २ क्षेत्राबाहेर जाणाऱ्या व क्षेत्रात येणाऱ्या खेळाडूचे क्रमांक जाहीर करील. बदली खेळाडूची सूचना मिळताच त्याला क्षेत्राबाहेर येणे बंधनकारक आहे व त्याची जाग बदली खेळाडू घेईल.

ब) बाहेर येणाऱ्या खेळाडूस जर खो दिल्यास तो कोणत्याही संरक्षकाचा पाठलाग करू शकत नाही किंवा खो देऊ शकत नाही असेल केल्यास बदली खेळाडूची किंवा पूर्ण होईपर्यंत नियमोल्लंघन घोषित केले जाईल.

क) खेळाडू बदल करताना बदली खेळाडूने गुणलेखकाच्या उजव्या बाजूला १ मी. १ मी. चौरस आखलेल्या चौरसात उभे राहावे.

ड) क्षेत्रात प्रवेश करताना बदली खेळाडूने त्वरीत आक्रमण करू शकणार नाही. त्याला सुरूवातीला खो द्यावाच लागेल.

११) काही कारणानिमित्त अंतिम सामना न झाल्यास दोन्ही संघाना संयुक्त विजयी घोषित केले जाईल. क्रमवारी करीता व चषका करीता नाणेफेक केली

जाईल तसेच नाणेफेक विजयी संघास सुरूवातीचे सहा महिने नंतर सहा महिने पराभूत संघास चषक दिला जाईल.

१२) उपांत्य फेरीतील पराभूत दोन्ही संघास तृतीय क्रमांक दिला जाईल. पुढील स्पर्धेच्या क्रमवारीकरीता लघुत्तम आक्रमण पद्धतीने सामना खेळविला जाईल.



  • Reviews (0)
Nothing Found...

Leave a review

To leave a review, please login to your account. Login