- घर
- Show Content
कब्बडी
कब्बडी
चढाईसाठीची कौशल्ये :- पायाचा पंजा मारणे, लाथ मारणे, हात मारणे, उडी मारणे बचावात्मक कौशल्ये :- मनगट पकडणे, मांडी पकड, घोटा पकड, कंबर पकड, साखळीत पकड
१) नाणेफेक जिंकणाऱ्या संघास अंगण अथवा चढाई यापैकी एकाची निवड करण्याचा अधिकार राहिल आणि नाणेफेक हरणाऱ्यास अंगण अगर चढाई यातून राहिलेल्या एकाची निवड करता येईल. दुसऱ्या डावात अंगणाची अदला बदल करावी आणि ज्या संघाने आपला खेळाडू प्रथम चढाईस पाठविला नसेल त्या संघाने आपला खेळाडू प्रथम चढाईस पाठवावा. पहिला डाव संपण्याच्या वेळी जितके खेळाडू खेळत असतील तितक्याच खेळाडूंना दुसरा डाव सुरू करावा. २) खेळ चालू असताना खेळाडूच्या शरिराच्या कोणत्याही भागाचा अंतिम मर्यादेबाहेर जमिनीस स्पर्श झाल्यास तो खेळाडू बाद झाला असे समजावे पण झटापटीच्या वेळी मात्र खेळाडूच्या शरीराचा कोणताही भाग क्रीडांगणाच्या मर्यादेच्या आत जमिनीस लागलेला असेल तोपर्यंत तो बाद झाला असे होत नाही.
३) अ) खेळ चालू असताना खेळाडू अंतिम मर्यादेबाहेर गेला तर तो बाद झाला असे समजावे अशा खेळाडूस समानअधिकाऱ्यांनी त्वरीत क्रीडांगणाबाहेर काढण्याचा प्रयत्न करावा. पंच अथवा सरपंच यांनी त्या खेळाडूचा क्रमांक सांगून बाद म्हणून मोठ्याने जाहीर करावे. चढाई चालू असेपर्यंत शिट्टी वाजवू नये.
ब) बचाव करणारा जर क्रमांक तीन अ च्या नियमान्वये क्रीडांगणाबाहेर गेला असेल व त्याने चढाई करणाऱ्यास पकडले तर चढाई करणारा नाबाद जाहीर करावा. बचाव करणारा अथवा करणारे अंतिम मर्यादेबाहेर गेले असतील तेच बाद झाल्याचे जाहीर करावे. बचाव करणारा अगर करणारे क्रीडांगणाबाहेर गेल्याने बाद होऊनही परत पकडीत सहभागी झाल्यास त्याच्या कृत्याबाबत विरोधी संघास एक तांत्रिक गुण द्यावा.
४) झटापट सुरू झाली की राखीव क्षेत्राचा क्रीडा क्षेत्रामध्ये समावेश होतो. झटापट संपल्यानंतर झटापटीत समाविष्ट असलेल्या खेळाडूंनी आपपल्या
अंगणात प्रवेश करीत असताना राखीव क्षेत्राचा उपयोग केला तरी चालेल. (हा नियम फक्त बचाव करणाऱ्याच्या अंगणातील क्रियेस ग्राह्य धरला जाईल.
५) चढाई करणाऱ्याने दम घालण्याच्या वेळी “कबड्डी' हा शब्दोचार स्पष्ट केला पाहिजे. जर तो “कबड्डी' असा सुस्पष्ट दम घेत नसेल तर पंचाने त्यास परत पाठवावे आणि विरुद्ध संघास एक तांत्रिक गुण देऊन पुन्हा त्यांनाच चढाईची संधी द्यावी.
६) चढाई करणाऱ्याने प्रतिपक्षाचे अंगणास स्पर्श करण्यापूर्वी दम घालण्यास प्रारंभ केला पाहिजे. जर त्याने उशिरा दम घालण्यास प्रारंभ केला तर पंच किंवा सरपंचाने विरुद्ध संघास तांत्रिक गुण जाहीर कररून त्यास पुन्हा चढाईची संधी द्यावी.
७) आपली पाळी नसताना जर एखादा खेळाडू प्रतिपक्षाच्या अंगणात चढाईस गेला तर पंचांनी अथवा सरपंचांनी त्यास परत पाठवावे व विरुद्ध संघास ___ एक तांत्रिक गुण द्यावा.
८) एका वेळेस फक्त एकच खेळाडूने प्रतिपक्षाचे अंगणात चढाईस जावे. एका वेळी जर एकाहून अधिक खेळाडूप्रतिपक्षाच्या अंगणात चढाईस गेले तर पंच अथवा सरपंचाने त्यांना परत बोलवावे व विरुद्ध संघास एक तांत्रिक गुण जाहीर करून पुन्हा त्यांनाच चढाईची संधी द्यावी.
९) चढाई करणारा परत आपल्या अंगणात आल्यावर किंवा प्रतिपक्षाच्या अंगणात बाद झाल्यास लागलीच दुसऱ्या संघाने आपला एक खेळाडू विरुद्ध
संघाच्या अंगणात पाच
(५) सेकंदाच्या आत चढाईस पाठवावा. अशा त-हेने आळीपाळीने चढाई करण्यास खेळाडू पाठविण्याचा क्रम खेळ संपेपर्यंत चालू ठेवावा मात्र चढाई करणाऱ्याने चढाई करण्यासाठी पाच सेकंदापेक्षा जास्त वेळ घेतल्यास त्यांची चढाईची पाळी संपली असे जाहीर करून विरुद्ध संघास एक तांत्रिक गुण द्यावा व पुन्हा त्यांनाच चढाई करण्यास सांगावे.
१०) चढाई करणाऱ्यास बचाव करणाऱ्यांनी पकडले असता चढाई करणारा जर त्यांच्या पकडीच्या प्रयत्नातून सुटून सुरक्षित आपल्या अंगणात आल्यास त्याचा पाठलाग करता येणार नाही. परंतु चढाई करणारा बचाव करणाऱ्यास किंवा करणाऱ्यांना केवळ स्पर्श करून आपल्या अंगणात सुरक्षित जात असेल. अशा वेळी त्याचा पाठलाग करता येईल.
११) चढाई करत असताना प्रतिपक्षाच्या अंगणात जर चढाई करणाऱ्याचा दम गेला तर तो बाद झाला असे समजावे.
१२) चढाई करताना पकडला गेल्यावर बचाव करणाऱ्याने बुद्धीपुरस्पर त्याच्या तोंडावर हात ठेऊन त्याच्या दमात अडथळा करू नये. तसेच कोणत्याही स्वरूपाची कैची अथवा दुखापत होईल असे आरोग्यास अपायकारक उपाय योजून पकड करू नये. तसे घडल्यास दुष्टोपत्तीस आल्यास, चढाई करणारा बाद नसल्याचे पंचांनी अथवा सरपंचाने जाहीर करावे. (सामान्याचे अधिकार नियम क्र.३ आणि ४ दंड योजनेसाठी अभ्यासावा.)
१३) बचाव करणाऱ्याने स्वत:च्या शरीराच्या कोणत्याही भागाने चढाई करणाऱ्यास बुद्धीपुरस्पर बचाव करणाऱ्यास अंतिम मर्यादेबाहेर ढकल अगर ओढू नये. जर चढाई करणारा अंतिम मर्यादेबाहेर ढकलला अगर ओढला गेला असेल तर पंचाने अथवा सरपंचाने अशा अंतिम मर्यादेबाहेर ढकलणाऱ्या अथवा ओढणाऱ्या खेळाडूस बाद म्हणून जाहीर करावे.
१४) चढाई करणारा खेळाडू जोपर्यंत आपल्या अंगणात परत येत नाही तोपर्यंत बचाव करणाऱ्या खेळाडूंपैकी कोणीही शरीराच्या कोणत्याही भागाने चढाई करणाऱ्या खेळाडूच्या अंगणास मध्य रेषेपलीकडे स्पर्श करता कामा नये. तसे केल्यास ते बाद होतील व प्रतिपक्षास तितके गुण मिळतील.
१५) नियम क्रमांक १४ प्रमाणे बाद झालेल्या बचाव करणाऱ्या खेळाडूने जर चढाई करणाऱ्यास पकडले किंवा पकडण्यास मदत केली असेल तर संघास एक तांत्रिक गुण द्यावा. व चढाई करणारा आपल्या अंगणात सुरक्षितपणे आला असे समजावे आणि ज्या बचाव करणाऱ्या खेळाडू अथवा खेळाडूंचा प्रतिपक्षाचे अंगणास स्पर्श केला असेल त्यासच बाद म्हणून जाहीर करावे.
१६) एखाद्या संघाने प्रतिपक्षाचे सर्व गडी बाद केले अथवा प्रतिपक्षाचे सर्व गडी बाद झाले व विरुद्ध पक्षाचा गडी कुणीच पुन्हा जिवंत होऊ शकत नसेल, तर त्या संघाने लोण केला असे समजावे व बाद केलेल्या खेळाडूच्या गुणाव्यतिरिक्त लोणाचे दोन जादा गुण जाहीर करावेत. यानंतर दोन्ही संघातील खेळाडू आपापल्या अंगणात १० सेकंदात प्रवेश करतील. अन्यथा पंच अथवा सरपंच प्रतिपक्षास तांत्रिक गुण जाहीर करतील. त्यानंतरही एखादा संघ आपल्या अंगणात प्रवेश करीत नसेल तर सरपंच अशा संघास आपल्या अंगणात येण्याची सुचना करील. या उपरही तो संघ एक मिनीटाच्या आत आपल्या अंगणात आला नाही तर तो संघ त्या सामन्यापुरता बाद करून विरुद्ध संघ जिंकल्याचे जाहीर करावे.
१७) चढाई करणारा प्रतिपक्षाच्या अंगणात चढाई करीत असताना त्याला त्याच्या संघातील एखाद्या खेळाडूने अन्य प्रकारे सुचित केल्यास पंचाने
अथवा सरपंचाने विरुद्ध संघास एक तांत्रिक गुण द्यावा.
१८) चढाई करणाऱ्या किंवा बचाव करणाऱ्या खेळाडूस अवयव अथवा धड याशिवाय शरीराचे इतर कोणत्याही भागाने बुद्धीपुरस्पर पकडू नये. जो या नियमांचा भंग करील तो खेळाडू बाद झाल्याचे जाहीर करावे. जर चढाई करणाऱ्या खेळाडूस बुद्धीपुरस्पर अवयव व धड याशिवाय शरीराच्या इतर भागाने पकडले असेल तर पंचाने अथवा सरपंचाने चढाई करणारा खेळाडू बाद नसल्याचे जाहीर करावे. (टिप : एखाद्या चढाई करणाऱ्यास जाणुनबुजून त्याचे कपडे अथवा केस धरून पकड केल्यास त्या खेळाडूस नाबाद म्हणून जाहीर करावे आणि नियम क्र.१८ चा भंग करणाऱ्या बचाव पक्षाच्या खेळाडूस बाद म्हणून जाहीर करावे.)
१९) प्रतिपक्षाच्या एक किंवा अनेक खेळाडू बाद झाले म्हणजे दरवेळी बाद करणाऱ्या संघाचा खेळाडू बाद झालेल्या क्रमांकाने जिवंत होतो.
सामन्यासंबंधी नियम
१) संघ :- प्रत्येक संघात कमीत कमी १० खेळाडू आणि जास्तीत जास्त १२ खेळाडू असतील. एका वेळेस ७ खेळाडू क्रीडांगणात खेळावयास उतरतील आणि उरलेले ५ खेळाडू राखीव म्हणून राहतील.
२) सामन्याची कालमर्यादा :- सामन्याची कालमर्यादा १५ मिनिटांची व ५ मिनीटांची विश्रांती विभागलेल्या अशा दोन भागांची असेल. विश्रांतीनंतर अंगणाची अदलाबदल करावी पहिला डाव संपण्याचे वेळी जितके खेळाडू असतील तितक्याच खेळाडूंनी दुसरा डाव सुरू करावा. (टीप :- प्रत्येक डावाची शेवटची चढाई चालू असताना जर वर नमुद केलेली खेळाची ठराविक वेळ संपली असेल तरीही ती चढाई पूर्ण होऊ द्यावी.)
३) गुणपत्रक भरण्याची पद्धती :
अ) प्रतिपक्षाच्या बाद झालेल्या प्रत्येक खेळाडूगणिक एक गुण विरूद्ध संघाला मिळेल.
ब) अव्वल पकड केल्यास पकडीचा एक व अधिकचा एक असे दोन गुण त्या संघास मिळतील. क) जो संघ प्रतिस्पर्ध्यावर लोण देईल, त्या पक्षास लोणचे दोन गुण मिळतील. गडी बाद होणे व जीवंत होणे हा नियम सामना संपेपर्यंत लागू राहिल.
४) तृटीत काळ : संघनायक, संघशिक्षक किंवा कोणताही सहभागी खेळाडू सरपंचाच्या परवानगीने खेळाच्या मध्यंतराअगोदर दोन वेळा व मध्यंतरानंतर दोन वेळा तृटीत काळ मागूशकेल. मात्र अशा प्रत्येक तृटीत काळाची मर्यादा ३० सेकंदापेक्षा जास्त नसेल. तृटीत कालावधीत जेवढा वेळ गेला असेल तेवढाच वेळ उरलेल्या खेळात समाविष्ट करण्यात येईल.
अशा तृटीत काळात खेळाडूंना आपले अंगण सोडून जाता येणार नाही. जो खेळाडू (अथवा संघ शिक्षक) या नियमांचे उल्लंघन करील त्या संघाविरूद्ध एक तांत्रिक गुण जाहीर करण्यात येईल.
वीजपुरवठा बंद पडणे, मुसळधार पाऊस पडणे, लोकांनी व्यत्यय आणणे, खेळाडू जखमी झाल्यास, क्रीडांगणाच्या रेषा पुन्हा आखाव्या लागल्यास इत्यादी कारणास्तव पंच/सरपंच अधिकृत तृटीत काळ घेऊ शकतात. तृटीत कालावधीत जेवढा वेळ गेला असेल तेवढा वेळ उरलेल्या वेळात समाविष्ट करण्यात येईल.
५) खेळाडू बदली करणे :
अ) सरपंचाच्या परवानगीने पाच खेळाडू सामन्याच्या मध्यांतर व तुटीत कालावधीत बदलता येतील.
ब) बदलेललाखेळाड पन्हा बदली खेळाड म्हणन घेता येईल
क) जर एखादा खेळाडू सामन्यासाठी निलंबित अथवा सामना कालावधीसाठी बडतर्फ झाल्यास त्याचे ऐवजी बदली खेळाडू घेता
ड) अधिकृत तृटीत कालावधीत खेळाडू बदलता येणार नाही.
इ) बाद झालेल्या खेळाडू ऐवजी बदली खेळाडू घेता येणार नाही
६) बोनस गुण :
अ) चढाई करणाऱ्याने बोनस रेषा ओलांडल्यास एक बोनस गुण जाहीर करावा. बोनस रेषा ओलांडल्यानंतर चढाई करणारा पकडला गेला तर तो बाद झाल्याचे जाहीर करावे व विरुद्ध संघास एक गुण द्यावा.
ब) अंगणात कमीत कमी सहा बचाव करणारे खेळाडू असतील तर बोनस नियम लागू होईल. बोनस गुण चढाई संपल्यानंतर पंच अथवा सरपंचाने आपल्या हाताचा अंगठा वर करून जाहीर करणे.
क) चढाई करणारा खेळाडू जर बोनस रेषा ओलांडीत असताना पकडला गेला तर बोनस गुण जाहीर करता येणार नाही. क्षेत्र रक्षण करणाऱ्या संघास एक गुण जाहीर करावा.
ड) चढाई करणाऱ्याने बोनस रेषा ओलांडल्यानंतर जर बचाव पक्षातील एक किंवा अनेक खेळाडूंना स्पर्श करून आपल्या अंगणात आला असेल तर त्यास एक बोनस गुण द्यावा व त्याने बाद केलेल्या खेळाडूंचे गुणही द्यावेत.
इ) चढाई करणाऱ्याने बचाव पक्षातील खेळाडू अथवा खेळाडूंना स्पर्श करण्याअगोदर अथवा बचाव करणाऱ्यांनी चढाई करणाऱ्याची पकड करण्याअगोदर बोनस रेषा ओलांडली तरच बोनस गुण जाहीर करावा. स्पर्श अथवा झटापट झाल्यावर चढाई करणाऱ्यांने बोनस रेषा
ओलांडली तर बोनस गुण देता येणार नाही.
फ) बोनस गुण जाहीर झाल्यास बाद खेळाडू जीवंत होऊ शकत नाही.
ग) जर एक किंवा अनेक खेळाडू निलंबित अथवा बडतर्फ करण्यात आले असतील तरी बोनस रेषा ओलांडण्याच्या नियमानुसार ते खेळाड अंगणात आहेत असे गृहीत धरून बोनस गुण जाहीर करावा.
७) अव्वल पकड:
अ) अंगणात तीन किंवा त्यापेक्षा कमी खेळाडू (बचावपटू) असताना त्यांनी पकड केल्यास ती अव्वल पकड समजावी. पकड करणाऱ्या आपले क्रीडांगण संघास पकडीच्या गुणाबरोबर एक जादा म्हणजे एकूण दोन गुण द्यावेत. गुणपत्रिकेत या गुणांची नोंद करताना प्रथम पकडीचा गुण व नंतर अधिकचा गुण अशा प्रकारे नोंद करावा.
ब) अंगणात तीन किंवा ज्यापेक्षा कमी खेळाडू (बचावपटू) असताना चढाईपटू स्वयंचित झाला व उर्वरित तीन खेळाडूंनी चढाईपटूची पकड केली तर ती अव्वल पकड समजावी.
ड) जेव्हा एक किंवा त्यापेक्षा जादा खेळाडू निलंबित असतील तर जेवढे खेळाडू निलंबित असतील ते खेळाडू अंगणात गृहीत धरून अव्वल पकड हा नियम अंमलात अणावा.
ई) अव्वल पकड हा नियम चढाईपटू व बचावपटू दोघेही बाद ग्राह्य मानला जाईल.
८) निर्णायक चढाई :
अ) चढाईमध्ये गुण मिळविणे अगर गुण गमावणे या क्रिया घडविणारी प्रत्येक चढाई 'निर्णायक चढाई' समजली जाईल. पहिल्या दोन सलग चढाया अनुत्पादित झाल्यास तिसरी चढाई ही निर्णायक असावयास हवी. या चढाईत गुण न नोंदविल्यास ती चढाई अनुत्पादित समजून चढाईचा खेळाडू बाद दिला जाईल व विरूद्ध संघास एक गुण दिला जाईल. प्रत्येक डावाच्या सुरूवातीस चढाई ही त्या-त्या संघाची पहिली चढाई समजावी.
ब) खेळाडू, प्रशिक्षक किंवा व्यवस्थापक यांना पिवळे किंवा लाल कार्ड दाखवून विरूद्ध संघास तांत्रिक गुण जाहिर केल्यास हा गुण निर्णायक चढाईसाठी ग्राह्य धरता येणार नाही.
९) अंतिम निकाल : संपूर्ण खेळ संपल्यानंतर ज्या संघाची गुणसंख्या अधिक असेल तो संघ विजयी झाल्याचे जाहीर करावे.
१०)बाद पद्धतीत गुण झाल्यास :
१) दोन्ही संघात क्षेत्ररक्षणाकरिता सात खेळाडू अंगणात असतील आणि दोन्ही संघांना प्रत्येकी पाच चढायांची संधी आळी पाळीने दिली जाईल.
२) अशावेळी निदान रेषेवर क्षेत्ररक्षण करून खेळ खेळविला जाईल.
३) यावेळी निदान रेषा ही बोनस रेषेच्या नियमाप्रमाणे गृहीत धरली जाईल आणि बोनस रेषेचे सर्व नियम अंमलात येतील.
४) चढाई करणाऱ्याने बोनस रेषा सम निदान रेषा ओलांडल्यास एक गुण दिला जाईल.
५) चढाई करणारा जर बोनस रेषा सम निदान रेषा ओलांडून बचाव पक्षातील एक किंवा अनेक खेळाडूंना स्पर्श करून आपल्या अंगणात सुरक्षित आला तर त्यास एक बोनस गुण द्यावा व त्याने बाद केलेल्या खेळाडूंचे गुणही द्यावेत.
६) अशावेळी खेळाडू बाद किंवा जीवंत होणे ही प्रक्रिया अंमलात न आणता फक्त गुण मिळाल्याचे गृहीत धरले जाईल.
७) पाच-पाच चढाई सुरू करण्यापूर्वी दोन्ही संघाच्या संघनायकाने पाच चढाई करणाऱ्या खेळाडूंचा क्रमांक व नाव क्रमवारी चढाई करण्यासाठी देणे आवश्यक आहे. अशा वेळी क्षेत्ररक्षण करताना सात खेळाडूंपैकी खेळाडू बदलता येणार नाही.
८) सरपंच, दिलेल्या क्रमवारीनुसार आळीपाळीने चढाई करण्यास सांगेल.
९) चढाईसाठी दिलेल्या यादीतील पाच खेळाडूंपैकी जर एखाद्या खेळाडूस त्याची चढाईची पाळी येण्यापूर्वी दुखापत झाल्यास उर्वरीत दोन खेळाडूंपैकी एकास चढाईची पाळी देता येईल.
१०) ज्या संघाने खेळ सुरू करताना प्रथम चढाई केली असेल त्याच संघास या वेळी पहिली चढाई दिली जाईल.
११) यानंतर ही समान गुण झाल्यास सुवर्ण चढाई या नियमाचा आधार घेतला जाईल.
टीप :- या पद्धतीच्या खेळामध्ये एक किंवा अनेक खेळाडू बडतर्फ किंवा निलंबित ठरल्यास तितके खेळाडू संख्येने कमी धरून खेळ खेळविला जाईल. बोनस गुण मिळण्याच्या क्रियेत अशा खेळाडूंची संख्या गृहीत धरली जाईल. सुवर्णचढाई :- पाच-पाच चढाई नंतरही जर सामना समान गुणावर असेल तर चढाई करिता नव्याने नाणेफेक केली जाईल. जो संघ नाणेफेक जिंकेल त्या संघास चढाई करण्याची संधी दिली जाईल. सुवर्ण चढाई नंतरही सामना समान गुणांवर असेल तर प्रतिपक्षास (संघास) सुवर्ण चढाई करण्याची संधी दिली जाईल. सुवर्ण चढाईत जी संघ निर्णायक गुण मिळविल तो संघ विजयी ठरविला जाईल. याउपरही सामना समान गुणावर संपला तर नाणेफेक करून सामना निर्णायक करावा.




- Reviews (0)
Nothing Found...Leave a review